एस टी प्रवासी महिलेचे दागिने चोरी प्रकरणी दोन संशयित महिलांना अटक ; १२ लाखाचे दागिने गेले होते चोरीस

कणकवली ( वार्ताहर )
एस टी बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा उठवत एका विवाहितेच्या पर्समधील सुमारे १२ लाख रुपये किमतीचे २१ तोल्याचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी पोलिसांनी बुधवारी दोन संशयित महिलांना येथील बस स्थानकावर अटक केली. साक्षी अरुण बंतू ( ३० ) व रेखा संतोष तंकाई ( ५४ ) दोन्ही राहणार ओरंगाबद अशी त्यांची नाव आहेत. येथील न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या मुंबई सांताकृश राहणारी संचीता सूर्यकांत कदम या त्यांच्या वैभववाडी – कुर्ली येथील घरी जाण्यासाठी कणकवली – लातूर एस टी बस मध्ये चढत असताना १७ एप्रिल रोजी चिरीची ही घटना घडली. बस मध्ये चढल्यावर संचिता कदम यांना त्यांच्या हड बागेची चैन उघडी दिसली म्हणून संशय आल्याने दागिने ठेवलेली छोट्या पर्सची खात्री केली तर त्यांना ती आढळून आली नाही तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली.