अशोक पोंक्षे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान

Ashok Ponkshe honored with Samaj Ratna Award

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचे सुपुत्र व प्रसिद्ध श्री सूर्यनारायण मंदिर देवस्थान चे अध्यक्ष श्री अशोक काशिनाथ पोंक्षे यांना डोंबिवली येथील हेरंब म्युझिक फौंडेशन च्या समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डोंबिवली येथे नुकत्याच झालेल्या हेरंब म्युझिक फौंडेशन च्या सांस्कृतिक कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान बहाल करण्यात आला. श्री अशोक पोंक्षे यांच्या समाजिक क्षेत्रातील अनुकरणीय कामगिरी बद्दल हा पुरस्कार देण्यात आला.कोविड काळात केलेली समाजिक मदत तसेच अनेक सेवाभावी संस्थांना ते देत असलेला मोलाचा हाथ ,याविषयीं या कार्यक्रमात अशोक पोंक्षे यांच्या करावी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली..या कार्यक्रमावेळी हेरंब म्युझिक चे श्री रवी पोंक्षे,सौ सोनिया पोंक्षे,व अन्य मान्यवर उपस्थित होते.