पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ चे १०० वे प्रसारण भाजपच्या दक्षिण रत्नागिरीतील १२० शक्तिकेंद्रांवर ऐकले जाणार

The 100th broadcast of Prime Minister Narendra Modi’s ‘Mann Ki Baat’ will be heard on BJP’s 120 power centers in South Ratnagiri.

रत्नागिरी । प्रतिनिधी : एप्रिल महिन्यातील शेवटच्या रविवारी म्हणजेच ३० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ चे १०० वे प्रसारण होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा संवाद दक्षिण रत्नागिरीतील 120 शक्तिकेंद्रांवर सामूहिक उपस्थितीत पार पडणार आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ चा 100 वा म्हणजे शतकोत्सवी कार्यक्रम प्रत्येक गावात शक्तिकेंद्रामध्ये सामूहिक उपस्थितीत कार्यकर्ते व नागरिक यांच्या समवेत साजरा केला जाणार आहे.
5 बूथ मिळून एक शक्तिकेंद्र अशी संघटनात्मक रचना बनवण्यात आली असुन या प्रत्येक बूथच सशक्तीकरण अभियान सुरू आहे. या सशक्तीकरण कार्यक्रमात ‘मन की बात’ कार्यक्रम सामूहिक पद्धतीने सादर होणार आहे. यासाठी सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, विस्तारक, नगरसेवक, बूथ आणि शक्तिकेंद्र प्रमुख आयोजनात व्यस्त असून जय्यत तयारी करून ‘मन की बात’ मधील पंतप्रधान मोदी यांचा संवाद सामूहिक पद्धतीने ऐकून त्यावर चर्चा व्हावी ,संपुर्ण संघटन सक्रिय व्हावे असा प्रयत्न होत आहे.

रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील 5 मंडला मध्ये 120 ठिकाणी शतकोत्सवी ‘मन की बात’ हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. सर्व स्थरातील कार्यकर्ते नागरिक बंधुभगिनी यांनी आपापल्या ठिकाणी भाजपा तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.