18th Anniversary Celebration of Goddess Sri Mahalakshmi Temple of Bhambed village
१ मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील भांबेड गावचे आराध्य दैवत आई श्री महालक्ष्मी मंदिराचा १८वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी दिनांक १ मे रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सोमवारी १ मे रोजी सकाळी ७.३० ते ८.३० अभिषेक, ९ वाजता भव्य दिंडी सोहळा (श्री गंगोबा मंदिर ते महालक्ष्मी मंदिर) त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे .११ वाजता ह भ प समीर महाराज सकपाळ (मुंबई) यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२.४५ महाआरती त्यानंतर १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तीन ते सहा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वाजता ह भ प सोनू बुवा पायी दिंडी संस्था भांबेड यांच्यावतीने हरीपाठाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता श्री सोळजाई नाट्य मंडळ देवरुख यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे.संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री महालक्ष्मी मंडळ भांबेड चे सर्व पदाधिकारी सदस्य मेहनत घेत आहेत.