तांबुळी येथे आंबेडकर जयंती उत्सव.

Ambedkar Jayanti celebrations at Tambuli.

ओटवणे(प्रतिनीधी) शनिवार २९एप्रिल २०२३ रोजी आदर्श नगर तांबुळी येथे बोधिसत्व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २३२ वा जयंती उत्सव साजरा होत असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. रुपेश पाटकर, डॉ अनिल सरमळकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा जयंती उत्सव पार पडत आहे. सकाळी १०वा. पंचशील ध्वजा रोहण, स.११वा.जय भीम रॅली, ६ वा. स्वागत समारंभ, सं. ७वा. गुणदर्शन पर कार्यक्रम,८ वा. अभिवादन सभा,९.३० वा. तर नितीन सावंत पुरस्कृत गोव्यातील सुप्रसिद्ध गायकांचा शिवगीत भिमगीतांचा सदाबहार कार्यक्रम पार पडणार आहे तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला मंडळ, तरुण मंडळ तसेच समस्थ आदर्श नगर ग्रामस्थ तांबुळी यांच्यावतीने करण्यात आले आहे