..तर लोकवर्गणीतून डायलिसिस मशीन दुरुस्त करणार

Google search engine
Google search engine

युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याची यांची माहिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसीस मशिन नादुरुस्त असल्याने त्या अभावी ही सुविधा बंद असल्यामुळे तालुक्यातील रूग्णांची गैरसोय होत आहे. दररोज डायलिसीससाठी रूग्ण हे ग्रामीण भागातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, डायलिसीस मशीन बंद असल्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून तातडीनं ही मशीन दुरुस्ती करून सेवा सुरळीत करून न दिल्यास युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून ही मशीन दुरुस्ती करून दिली जाईल अशी माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेली डायलिसिस मशीन नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. प्रशासनाचे याबाबत लक्ष वेधूनही या मशीनची तात्काळ दुरुस्ती न झाल्याने रुग्णांची परवड होत असून प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा लोकवर्गणीतून ही मशीन दुरुस्त करून द्यावी लागेल असा इशाराही देव्या सूर्याजी यांनी दिला आहे

Sindhudurg