खेड (प्रतिनिधी) शहरात ऐन गणेशोत्सवातच झालेल्या २ लाख १८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास करत झालेल्या घडफोडीचा अद्यापही छडा लागलेला नाही. गणेशोत्सवाच्या धामधुमीत झालेल्या घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. घर बंद असल्याची संधी साधत चोरटे घरफोड्या करत असल्याने नागरिकांची सुरक्षितताही ऐरणीवर आली आहे.
शहरातील दादा महादेव देवरूखकर हे घर बंद करून गावी गेलेले असताना चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दागिन्यांवर डल्ला मारला होता. देवरूखकर कुटुंबिय घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली होती. मात्र ५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप घरफोडीचा छडा लागलेला ‘नाही. या घरफोडीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.