मांगेलीत कर्नाटक सीमेवर पोलीस चौकी

Mangelit Karnataka Seemawar Police Station

विधानसभा निवडणूक असल्याने पोलीस महानिरीक्षक यांचे कडून पाहणी

दोडामार्ग | सुहास देसाई
तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे असलेले सीमा तपासणी नाके कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दारू व अन्य सामुग्री वाहतूक होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे त्यासाठी मांगेलीत आज श्री प्रविण पवार पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांनी भेट देऊन पाहणी केली व याबाबत योग्य त्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.

तसेच दोडामार्ग तालुक्यातील कामकाजाचा आढावा व येणाऱ्या अडचणी याबाबत पोलीस कर्मचारी याचे कडून माहिती घेतली त्यानंतर कामकाजाचा व गुन्ह्याचा आढावा घेतला तसेच सीमेवर असलेल्या गावातील रस्ते वाहतूक व सीमेवरून होणारी बेकायदा वाहतूक याबाबत योग्य त्या सूचना केल्या. यावेळी उपअधीक्षक डॉ. श्रीमती सोळंखे दोडामार्ग पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.