सावंतवाडीच्या स्नुषा प्रा.सौ.हेमश्री चिटणीस ‘नेट-जेआरएफ’ साठी पात्र

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :

युजीसी मार्फत राष्ट्रीय स्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी ‘नेट-जेआरएफ’ ही परीक्षा सावंतवाडीच्या स्नुषा प्रा. सौ.हेमश्री किशोर चिटणीस या मराठी विषयातून उत्तीर्ण झाल्या असून,त्यासोबत त्या ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी सुध्दा पात्र ठरल्या आहेत.प्रा.सौ.चिटणीस या सध्या देवगड येथील श्री. स.ह.केळकर महाविद्यालयात मराठी विषयाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.त्या मालवण येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.सुवर्णलता काशिनाथ मांजरेकर आणि सांडवे हायस्कूल मधील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक श्री. काशिनाथ मांजरेकर यांच्या कन्या असून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी कर्मचारी श्री.महेश चिटणीस व सौ.मनीषा चिटणीस यांच्या स्नुषा आहेत.यापुर्वी त्या एप्रिल २०२१ मध्ये मराठी विषयातूनच ‘सेट’ही परीक्षा उत्तीर्ण असल्यामुळे या दुहेरी यशाबद्दल प्रा. सौ.हेमश्री चिटणीस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Sindhudurg