पालशेत येथील श्री गोवर्धन मंदिरात १ मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

Organized various programs on 1st May at Shri Govardhan Temple in Palshet

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पालशेत येथील श्री गोवर्धन मंदिराचा १५ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ७ ते ९ श्रींची पूजा व अभिषेक, सकाळी ९ ते ११ श्री सत्यनारायणाची महापूजा व तिर्थप्रसाद, दुपारी १२ ते ४ हळदीकुंकू समारंभ, सायं. ६ ते ८ वारकरी दिंडी, रात्री ८ ते ९ श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, पालशेत रामाणेवाडी यांचे सुश्राव्य भजन, रात्री ९ ते १० श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, पालशेत यांचे सुश्राव्य भजन, रात्री १० नंतर मनोरंजनात्मक खेळ असे कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गोवर्धन देवस्थान पालशेत यांच्या वतीने करण्यात आले आहे.