Amrit Mahotsav of Kirlos Bhavewadi Primary School on 30th April
कणकवली | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किर्लोस भावेवाडी (ता.मालवण)या शाळेला ७५ वर्षे होत असल्याने या शाळेच्या अमृत महोत्सव समारंभ रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वा. किर्लोस भावेवाडी रामेश्वर मंदिर ते शाळेपर्यंत भव्य शोभायात्रा सकाळी १०.३० उद्घाटन समारंभ ,
आजी-माजी शिक्षक विद्यार्थी सत्कार व मनोगत
दुपारी 3 वा.विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम ,सायं. ७ वा. मान्यवरांचे सत्कार , समारोप समारंभ ,रात्री ९ वा. स्वर्गीय लोकराजा सुधीर कलिंगण लिखित संचालक सिध्देश कलिंगण यांच्या
श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा शापित राजनंदिनी हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमृत महोत्सव कमिटी व शाळा व्यवस्थापन समिती किर्लोस भावेवाडी प्राथमिक शाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.