सोंडे ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियान, देवघर-सोंडे महिला बचतगटाचा उपक्रम
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील देवघर – सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक मूर्तीच्या वापराच्या प्रचारासाठी ‘डोअर टू डोअर’ जात जनजागृती केली. त्यानुसार महिला बचत गटाने निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा उपक्रम राबवला. सर्व थरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
देवघर – सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत आजवर विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांना ग्रामस्थांकडूनही उत्स्फर्त
प्रतिसाद लाभत असल्याने अभियान यशस्वी होत आहे. पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पढाकार घेतला. या उपक्रमात गावातील महिला बचतगटांना सामावून घेण्यात आले. बचतगटांनी निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करत अनोखा आदर्श निर्माण केला. सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामसेवक दीपक कदम व ग्रामस्थांनी उपक्रमाचे कौतक केले.











