सावंतवाडीचा सुपुत्र ऋषिकेश नंदकुमार पाटीलला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार

Google search engine
Google search engine

लाडली मिडिया अँड अडव्हर्टायझिंग अवार्ड फाॅर जेंडर सेन्सिव्हीटी पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडीचे सुपुत्र ऋषिकेश नंदकुमार पाटील यांना उत्कृष्ट व संवेदनशील पत्रकारितेसाठी महत्वाचा मानला जाणारा १२ वा “लाडली मिडिया अँड अडव्हर्टायझिंग अवार्ड फाॅर जेंडर सेन्सिव्हीटी ” पुरस्कार प्राप्त झाला आहे. युनायटेड नेशन्स पाॅप्युलेशन फंड यांनी हा पुरस्कार प्रायोजित केला होता. हैदराबाद येथे विश्व विद्यालयाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

ऋषिकेश पाटील हा सध्या इन्डी जर्नलला फ्रि लान्स पत्रकारिता करतो. तसेच हिंदुचे संस्थापक पी. साईनाथ यांच्या वेब पोर्टलसाठी त्याने लेखन केले आहे. कोयना परिसरातील लॅंड स्लाईड झालेल्या परिसरात तसेच कोल्हापुर पूरग्रस्त भागात तसेच दिल्लीचे शेतकरी आंदोलन येथे प्रत्यक्ष ग्राऊंडवरुन रिपोर्ट केले आहेत.

किसान आंदोलनात जाताना आदिवासी महिलांसोबत प्रवास करत, आदिवासी महिला शेतमजूर कस्तुरबा सरोले यांच्या जीवनावर इंडी जर्नल या पोर्टल साठी स्टोरी लिहिली व त्यासाठीच त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. ऋषिकेश हा अभिनेते नंदू पाटील आणि डॉ. विजयालक्ष्मी चिंडक-पाटील यांचा तो .सुपुत्र आहे.

Sindhudurg