शिवसेना जिल्हाप्रमुखांचा कर्टेल येथे ग्रामस्थांशी संवाद

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील कर्टेल येथे शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विषयी महिलांना मार्गदर्शन केले.
योजनेबाबत कागदपत्रांची आवश्यक माहिती महिलांना देण्यात आली. शाखाप्रमुख, अंगणवाडीसेविका यांना ‘योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्याबाबत सूचित करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शाखाप्रमुख संजोग म्हादलेकर, उपशाखाप्रमुख बाळू मयेकर, रघुनाथ घाणेकर, बाबाराम घाणेकर, शाखाप्रमुख पिंट्या कदम, विलास गुरव, आप्पा कदम, श्रीकांत चव्हाण, अॅड. दिलीप चव्हाण, शिरीषकुमार चव्हाण, युवासेना सचिव करण चव्हाण, रमेश खांबे, अनंत कावणकर, पांडुरंग मळेकर, राजा कावणकर आदी उपस्थित होते.