जिल्हास्तरीय क्युरोगी तायक्वांदो स्पर्धेवर रत्नागिरी मधील खेळाडूंचे वर्चस्व, तब्बल 40 पदकांचा पडला पाऊस

Athletes from Ratnagiri dominated district level Kurogi Taekwondo tournament, as many as 40 medals rained

16 वी रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज क्युरोगी व 10 वी पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृह, नवभारत छात्रालय दापोली येथे दिनांक 25 ते 27 एप्रिल रोजी मोठ्या दिमाखात पार पडली. जिल्ह्यातील अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झाले होते. पण खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर रत्नागिरी मधील खेळाडूंचा दबदबा शेवटपर्यंत राहिला. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी मधील खेळाडूंनी एकूण 15 सुवर्णपदके, 10 कास्यपदके, आणि 15 रौप्य अशी एकूण 40 पदकांची कमाई करून हम भी किसीसे कम नही हे दाखवून दिले. रत्नागिरीच्या खेळाडूंनी मागील वर्षा प्रमाणे या वर्षीही क्युरोगी प्रकारात सर्वाधिक पदक मिळवून मानाचा क्युरोगी मधील प्रथम क्रमांकाचा चषक रत्नागिरीच्या खेळाडूंना मिळाला, हा चषक तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री व्यंकटेश राव करा सर श्री शरद पवार साहेब श्री गणेश पवार यांच्या हस्ते श्री शाहरुख शेख मिलिंद भागवत व खेळाडूंनी यांनी स्वीकारला.
पदक विजेत्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
गोल्ड मेडल 🥇

स्वरा साखळकर ( सब ज्युनिअर )
रावी वारंग. ( स्पेशल कॅटेगिरी )
आर्या शिवडे. (कॅडेट)
आर्या शिवडे. (ज्युनिअर)
ऋतिक तांबे ( ज्युनिअर)
ओम् अपराज (ज्युनिअर)
अमेय सावंत. (सिनियर)
आर्या शिवडे. (सिनियर)
वेदांत चव्हाण. ( सिनियर)
रुद्र शिंदे (कॅडेट)
राधा रेवाळे ( सब ज्युनियर)
मानस शिवगण ( सब ज्युनियर)
वेदिका पवार ( सब ज्युनियर)
भक्ती डोळे ( सब ज्युनियर)

सिल्व्हर मेडल 🥈
सान्वी मयेकर. ( कॅडेट)
मृदुला पाटील. (कॅडेट)
सान्वी मयेकर. ( सिनियर)
समर्था बने ( सिनियर)
जिया केतकर (कॅडेट )
आर्या शेणवी ( ज्युनिअर)
दिव्यांका घाटगे (कॅडेट )
सुजल सोळंखे ( सिनियर )
सोहम सावंतदेसाई ( ज्युनिअर)

ब्राॅझ मेडल🥉
रोहीत कुंडकर. (स्पेशल कॅटेगिरी)
स्वरा साखळकर. (कॅडेट)
मृदुला पाटील ( ज्युनिअर)
सान्वी मयेकर. ( ज्युनिअर)
मृदुला पाटील. (ज्युनिअर)
श्रीनिधी पाटील. (सब ज्युनिअर)
विधान कांबळे. (सब ज्युनिअर)
साईराज चव्हाण. (सब ज्युनिअर)
यश भागवत. (सब ज्युनिअर)
ऋतिका पांचाळ. (सब ज्युनिअर)
पार्थ संजय कांबळे. ज्युनिअर)
प्रसन्ना गावडे ( सिनियर)
पार्थ गावडे (सिनियर)
यश परकर (सब ज्युनिअर)
साकेत परकर (सब ज्युनिअर)

पुमसे निकाल 🥋
स्वरा साखळकर (फ्री स्टाईल सुवर्णपदक)
स्वरा साखळकर (सिंगल रौप्य पदक)

गेले दोन महिने या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू आणि प्रशिक्षक अथक मेहनत घेत होते. तसेच सीनियर मुले या मध्ये वेदांत चव्हाण याला बेस्ट फायटर देऊन सन्मानित करण्यात आले रत्नागिरी मधील या सर्व विजेत्या खेळाडूंना SRK तायक्वांदो क्लबचे शाहरुख शेख जय भैरी तायक्वांदो क्लबचे मिलिंद भागवत गणराज तायक्वांदो क्लबचे प्रशांत मकवाना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार तसेच रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री वेंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो सचिव लक्ष्मणराव कररा, खजिनदार शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वास लोखंडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या