The maximum temperature in the state is expected to be higher in the month of May
एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे मे महिन्यातील हवामान अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. राज्यात मे महिन्यात कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात उन्हाची झळ कमी बसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मे महिन्यातही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्यातील अंदाज आज जाहीर करण्यात आला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक राहणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात देखील काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमानाची शक्यता आहे. विदर्भात एक-दोन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज असून महिन्यातील दोन दिवस सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे.











