माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती
युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी, राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जवळपास ३० टक्केहून अधिक सर्वसामान्य व गोरगरीब रुग्ण दररोज त्यांच्या सेवेचा लाभ घेतात. अशावेळी त्यांना नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवतो. याबाबत सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या संबंधित रक्त विभागातील अधिकाऱ्यांनी चर्चा केली असता हा विषय समोर आला. या संदर्भात त्यांनी सामाजिक बांधिलकीने वर्षातून एक तरी रक्तदान शिबिर घ्यावे अशी मागणी केली, जेणेकरून रुग्णांना त्याचा फायदा होईल. यासाठी संघटनेमार्फत जास्तीत जास्त रक्तदात्यांसह या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन शिबिर यशस्वी करावे असे आवाहन साळगावकर यांनी केले आहे.
या महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळाला गोवा मेडीकल कॉलेज, बांबुळी यांचेकडून सर्टिफिकेट व डोनेट कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आपल्या संस्थेची संपुर्ण नावे दोन दिवसात संघटनेच्या व्यक्तींकडे जमा करावे यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क देव्या सुर्याजी : ९९२२०८८२३८ रवी जाधव : ९४०५२६४०२७ संजय पेडणेकर : ९४२२३७९५०२ संतोष तळवणेकर ९४०३३६९१०३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन साळगावकर यांनी केले आहे.
Sindhudurg