आंबेलीत ट्रक आणि दुचाकीत अपघात ;दुचाकीस्वार गंभीर जखमी!!

Truck and two-wheeler accident in Ambeli; two-wheeler seriously injured!!

हेल्मेटमुळे वाचला!! ;वाहन चालकावर गुन्हा दाखल

दोडामार्ग | सुहास देसाई
आंबेली येथे झालेल्या अपघातात दुचाकीचालक अनिकेत विठोबा देसाई (वय-२५) मूळ गाव पाल रा.मणेरी हा गंभीर जखमी झाला मात्र हेल्मेट मुळे अनर्थ टळला आहे मात्र कमरेला गंभीर दुखापत झाली दोडामार्ग ग्रामीण रूग्णालय दाखल केल्यावर अधिक उपचारासाठी म्हापसा गोवा येथे नेण्यात आले या ठिकाणी उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितावर गून्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी,गुंडू किशन नेरुरकर (वय -५९) हे आपल्या ताब्यातील सिमेंटचे पाईप भरलेला ट्रक घेऊन दोडामार्गहुन मोर्ले च्या दिशेने जात होता यादरम्यान आंबेली येथील मंगल कार्यालयासमोर ट्रक ला ओव्हरटेक करून भेडशीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचालकाला समोरून येणाऱ्या चारचाकीने धडक दिली . धडक जोरात असल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला जाऊन त्याची दुचाकी मागून येणाऱ्या ट्रक च्या पुढच्या चाकाखाली गेली.या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांनंतर अधिक उपचारासाठी म्हापसा गोवा येथे दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत असून अपघातास कारणीभुत ठरलेल्या चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .