मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय चर्चासत्रात अभिनेते खा. अमोल कोल्हेची प्रगट मुलाखत

मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस विरोधी पक्षनेते अजित पवार यांची उपस्थिती

जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे गजानन नाईक यांचे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशन पुणे चिंचवड येथे होत असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती असणार आहेत. या अधिवेशनात ‘आम्ही अँकर ‘ हे चर्चासत्र त्याच बरोबर डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का हा परीसंवाद व चित्रपट अभिनेते खा. अमोलजी कोल्हे यांची प्रगट मुलाखत हे तीन कार्यक्रम पत्रकार बांधवांसाठी महत्त्वाचे व आकर्षण ठरणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परीषदेच्या ४३ व्या पिंपरी चिंचवड येथे १९ व २० नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय आधिवेशनत विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सध्या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू असून चर्चा सञ व परिसंवाद हे महत्वाचे ठरणार असून आम्ही अँकर हे चर्चासत्र आकर्षक ठरणार असून यामध्ये रोज आपल्या समोर टीव्ही चॅनलवर दिसणारी अँकर मंडळी ही रोज त्यांच्या समोर असणाऱ्या समस्या व त्यांचे प्रश्नही मांडणार आहेत त्यांचे अनुभव कथन करणार आहेत.
या चर्चासत्रात न्यूज १८ लोकमतचे मिलिंद भागवत,न्युज १८ चेच विलास बडे, एबीपी माझाचे अश्विन बापट, झी २४ तासच्या रेश्मा सांळुके व अनुपमा खानविलकर , टिव्ही ९ च्या निकिता पाटील यांचा सहभाग असणार आहे या बरोबरच दि डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का या महत्त्वपूर्ण विषयावर व सध्या पत्रकार चर्चेच्या असणाऱ्या विषयावर परिसंवाद होणारा असून या चर्चासत्रास अध्यक्षस्थानी जेष्ठ माध्यमकर्मी समिरण वाळवेकर, हे तर या चर्चासत्रात सकाळचे समूह संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, मॕक्स महाराष्ट्राचे संपादक रवी अंबेकर, जेष्ठ संपादक तुळशीदास भोईटे यासह परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख परिषदेचे विश्वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे आदींची उपस्थिती या चर्चासत्रात लागणार आहे. हे दोन्हीही चर्चासत्र या अधिवेशनाचे केंद्रबिंदू ठरणारा असून आकर्षणही येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचे ठरणार आहे त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील शिवछत्रपती म्हणून ओळखले जाणारे चित्रपट अभिनेते खा. अमोल कोल्हे यांची प्रगट मुलाखत हेही आकर्षण ठरणारा असून त्यांची मुलाखत मिलिंद भागवत व विलास बडे ही ज्येष्ठ अँकर मंडळी घेणार आहेत.
हे अधिवेशन यशस्वी करण्या साठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे पदाधिकारी परीश्रम घेत आहेत. यामुळे या अधिवेशनात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ येणाऱ्या पत्रकारांनी उपस्थिती लावून घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन आणि माजी अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांनी केले आहे.

Sindhudurg