मनीष दळवी यांना विशेष सन्मान!

Special honor to Manish Dalvi!

आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित

सिंधुनगरी | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे बँकेच्या माध्यमातून अनेक नवनवीन योजना आणून जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून झटत आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात दिलेले योगदान व अध्यक्ष मनीष दळवी यांचे ग्रामीण विकासासाठी चालू असलेले प्रयत्न याची दखल केंद्रस्तरावर ही घेण्यात आली आहे.पंतप्रधान मा नरेंद्र मोदी आपल्या 100 व्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधीत करणार आहेत.केंद्र व शासनाच्या वतीने हा कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.उदया 11 वाजता सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर मन की बात कार्यक्रम प्रसारीत होणार आहे.या कार्यक्रमासाठी काही विशेष निमंत्रितांना निमंत्रीत केले आहे.बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना ही या कार्यक्रमात विशेष निमंत्रीत केले आहे.