खेड(प्रतिनिधी) भारत सरकार स्वच्छता अभियाना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता सप्ताह च निमित्त साधून खेड नगर परिषद च्या आव्हानाला प्रतिसाद देत २९ सप्टेंबर रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्यामार्फत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात करून अभियान राबविण्यात आले
छत्रपती शिवाजी चौक ते सोनाराळी येथील सिद्धिविनायक मंदिर इथपर्यंत संपूर्ण भाग लिओ क्लब व खेड नगरपरिषद यांच्या सहकार्यातून स्वच्छ करण्यात आला एकमेकांच्या सहकार्यातून स्वच्छतेची वज्रमूठ आवळूया आणि अस्वच्छतेला खेड शहरातून दूर करूया हा संदेश देत ही मोहीम यशस्वी करण्यात आली यामध्ये लायन्स क्लब व लिओ क्लब मधील सर्व सभासद व शासकीय अधिकारी नगरपरिषदेमधील कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी रोडगे व खेड मधील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव का कामगिरी करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटी ने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेला लोकांनी मोठ्या प्रतिसाद दिला