संगलट-शेरवली मार्गावर दारूधंद्यावर धाड

 

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील संगलट-शेरवली मार्गावर विराचे देवस्थान येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी सुधीर धर्मा तांबे याच्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.