काळकाई देवी मंदिरात ३ पासून नवरात्रोत्सवाची धामधूम

 

९ दिवस धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, कीर्तनासह भजनाचाही जागर

खेड(प्रतिनिधी) भरणे येथील श्री देवी काळकाईच्या नवरात्रोत्सवास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहे. कीर्तनासह भजनातून जागरही करण्यात येणार आहे. जाखडी नृत्यांची जुगलबंदीही रंगणार आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

दररोज संध्याकाळी ६.३० वाजता आरती, ७ ते ७.३० वाजता हरिपाठ, १० वाजता दांडिया, ३ रोजी दुपारी ३ वाजता देवीला शासकीय सलामी, गावातील जाखडी नृत्य, ४ रोजी हरिपाठ व दांडिया, ५ रोजी शक्तीवाले शाहीर राजेश निकम व तुरेवाले शाहीर अमोल दैत यांच्यात जाखडी नृत्याची जुगलबंदी, ६ रोजी रात्री ८ वाजता राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते कबीर महाराज अतार यांचे कीर्तन, ७ रोजी महादेव लक्ष्मण पाटणे यांच्या स्मरणार्थ कळंबणी येथील अविनाश महाराज येसले यांचे कीर्तन, ९ रोजी जाखडी नृत्य, १० रोजी भरणे येथील दांडिया, ११ रोजी शक्तीवाले शाहीर संदीप मोरे, तुरेवाले शाहीर तुषार पंदेरे यांच्यात जाखडी नृत्यांचा सामना, १२ रोजी गावातील दांडिया, २४ रोजी श्री सत्यनारायण महापूजा, रात्री कोल्हापूर येथील वैभव ऑर्केस्ट्रा हा करमवणुकीचा कार्यक्रम होईल.उत्सवाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे, सचिव प्रशांत चव्हाण, खजिनदार सतीश पाटणे, उपाध्यक्ष सुरेश भुवड, राजेंद्र शिर्के, सहसचिव संदीप खेराडे, सहखजिनदार विजय फागे, गणपत घोले, सदस्य मधुकर शिंदे, सुरेश धुमाळ, प्रदीप भुवड, अंकुश भुवड, दीपक बैकर, चिराग घडशी, उदय पाटणे, पुजारी अनंत जंगम, विजय जंगम प्रयत्नशील आहेत.