पाटपन्हाळे तेलगडे, घाणेकर व इ. बंधू याच्या वतीने १ व २ मे रोजी विविध कार्यक्रम

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथील तरुण विकास मंडळ तेलगडे, घाणेकर व इतर बंधू यांच्या वतीने ग्रामदेवतांच्या पालख्या व श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. १ मे रोजी सकाळी ९ वा. ग्रामदेवतांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. त्या नंतर ओटी भरणे व दर्शनाचा कार्यक्रम, सायंकाळी ४ नंतर पालखी नाचविणेचा कार्यक्रम व सायंकाळी ६ नंतर भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला आहे. मंगळवार दि. २ मे रोजी दुपारी ४.३० वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, सायं. ६.३० वा. महाआरती, सायं. ७ वा. सुस्वर भजन श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ तेलगडेवाडी, सायं. ७ ते ९ महाप्रसाद, रात्री ९ वा. सत्कार समारंभ, रात्री १०.३० वा. नवतरुण नमन मंडळ वरवेली खालचीवाडी यांचे बहुरंगी नमन, पारंपारीक गण, गौळण आणि काल्पनिक वगनाट्य “सैतानी “वादळ” असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तरुण विकास मंडळ तेलगडे, घाणेकर व इतर बंधू यांच्यावतीने करण्यात आले आहे.