बेकायदा दारू विक्री प्रकरणी आरोंदा येथील एकावर कारवाई

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : गोवा बनावटीची

बेकायदा दारू विक्री करताना आरोंदा येथे एकावर कारवाई करण्यात आली. सातु आगस्तीन फर्नांडिस (रा. मटवाडी), असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि आरोंदा पोलिसांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास केली. दरम्यान या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित सातु फर्नांडिस हा आपल्या घराजवळ अवैध दारू विक्री करत होता. याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धडक देत ही कारवाई केली. यावेळी संशयिताकडून ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी सावंतवाडी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आरोंदा दुरक्षेत्राचे पोलीस यशवंत आरमार यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

Sindhudurg