सावंतवाडी : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ क्लिक कंप्यूटर कोर्सच्या राज्यातील टॉप ६ प्रशिक्षण केंद्रा मध्ये सावंतवाडी मधील माया कंप्यूटरची निवड झाली आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळा मार्फत एप्रिल २०२३ च्या विद्यार्थी प्रवेश अहवाला नुसार येथील माया इंटरप्राइसेसने बाजी मारली आहे. येथील केंद्रामध्ये १० वी -TY च्या विद्यार्थ्यांना विविद्य स्किल कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी ”सारथी’ व ‘एमकेसीएल’ यांच्या माध्यमातून उपक्रम राबविले जात आहे. एमकेसीएल द्वारे अभ्यासक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे.
इंग्लिश स्पिकिंग, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि, ऍडव्हान्स डिजिटल स्किल, डेटा एन्ट्री, अकौंटिंग, डिसायनिंग, हार्डवेअर नेटवर्किंग,प्रोग्रामिंग, डिजिटल फ्रिलांसींग, मॅनेजमेंट या सारखे ट्रॅक निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येतात. या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी सुरू झाली असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माया एंटरप्राईजेसच्या वतीने करण्यात आले आहे. माया कंप्यूटरच्या या यशा बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी राज्यातील टॉप १० प्रशिक्षण केंद्रामध्ये सावंतवाडी मधील माया कंप्यूटरची निवड













