पुन्हा आमच्या नेत्यावर बोललात तर जशास तसे उत्तर देणार..!
कणकवली : काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी जाणवली येथे बैलगाडी स्पर्धेमध्ये स्पर्धेवेळी पुढच्या वर्षी दोन बैल शोधणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांना ते शोधण्याची गरज भासणार नसून आमदार नितेश राणेंवर टीका केलेले अतुल रावराणे आणि कन्हैया पारकर हे दोघे बैलच आहेत. परंतु ते साधेसुधे बैल नसून ते गावठी बैल असल्याचा खोचक टोला भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना मेस्त्री म्हणाले, अतुल रावराणे, कन्हैया पारकर यांची दखल घेण्याएवढे ते काही मोठे नाहीत. अतुल रावराणे आणि कन्हैया पारकर यांना शिवसेना पक्षात काही किंमत नाही. फक्त टीका करायची आणि वा….वा…मिळवायची हा त्यांचा धंदा आहे. आमदार नितेश राणेंवर बोलण्याएवढे अतुल रावराणे, कन्हैया पारकर काही मोठे नाहीत. आमदार नितेश राणे यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. जनतेचे ज्वलंत प्रश्न आमदार नितेश राणे सोडवतात तसेच आमदार नितेश राणे असलेल्या विधानसभेच्या आमदारांच्या टॉप – टेन मधील नेते आहेत. जर पुन्हा आमच्या नेत्यांवर टीका केली तर जशात तसे उत्तर देऊ. तसेच पारकर आणि रावराणे हे गावठी बैलच असल्याचा टोलाही भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी लगावला आहे.