मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे खोत जुवा येथील
श्री देव मशेश्वर देवस्थान सार्वजनिक श्री सत्यनारायण महापुजा ०५ मे २०२३ रोजी आयोजित केली आहे. या निमित्त सकाळी ०९.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.०० वा. आरती, तिर्थप्रसाद महाप्रसाद, दुपारी ०१.०० वा. : महाप्रसाद, सायं. ०५.०० वा. : श्री देव जैन भरतेश्वर देवस्वारी आगमन,
रात्री १०.०० वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री. संतोष जोईल (श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ) विरुद्ध बुवा श्री. उदय पारकर (श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, कासार्ड). उपस्थीतीचे आवाहन समस्त खोत बांधव यांनी केले आहे.













