आमदार नितेश राणेंकडून दुसऱ्या टप्प्यात आणखीन १०० शाळकरी मुलींना सायकल वाटप

सायकल मिळताच मुलींच्या चेहऱ्यावर फुलला आनंद..!

संतोष राऊळ | कणकवली : कणकवली,देवगड,वैभववाडी मतदारसंघातील गरजू मुलींना शाळेत जाण्या – येण्या साठी आमदार नितेश राणे यांनी आज महाराष्ट्र दिनी दुसऱ्या टप्प्यातील शंभर मोफत सायकलचे वाटप केले. यापूर्वी ११० सायकल मोफत वितरित केलेल्या होत्या. जसजशी मागणी आणि गरज असेल त्या प्रमाणे मुलींना या सायकल दिल्या जात आहेत.सायकल हातात आली आणि एक रपेट मारत शाळकरी मुलींनी आपला आनंद व्यक्त केला. आमदार नितेश राणे यांनी दुसऱ्या टप्प्यात १०० शाळकरी मुलींना आज महाराष्ट्र दिनी कणकवलीत ओम गणेश बंगल्यावर मोफत सायकल वाटप केले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, करंजे माजी सरपंच तळगावकर,हरकुळ सरपंच राजन रासम,उप सरपंच सर्वेश दळवी,सचिन पारधिये,भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, वरवडे माजी उपसरपंच आनंद घाडी, माजी सरपंच इब्राहिम शेख, अचित कदम आदी उपस्थित होते.