पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे पागडेवाडी येथील श्री साईनाथ मित्र मंडळ व महिला मंडळ आयोजीत श्री सत्यनारायण महापूजा व श्री साई मंदिराचा २३ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दि. ४ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. ३ मे रोजी सायंकाळी ४ वाजता श्री साई पालखीची भव्य मिरवणूक, गुरुवार दिनांक ४ मे २०२३ रोजी पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता साई मूर्तीचा अभिषेक, सायं.३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायं.५ वाजता महाआरती, सायं. ६ ते ८.३० साई भंडारा (महाप्रसाद ) रात्री ८.३० वाजता सुस्वर भजन, रात्री ९.३० वा. विद्यार्थी सत्कार समारंभ, रात्री ठीक १०.३० वा. श्री भराडीन माता नमन मंडळ लांजा देवराईवाडी यांचे बहुरंगी नमन विशेष आकर्षण मुष्कासुराचे गर्वहरण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईनाथ मित्र मंडळ व महिला मंडळ पाटपन्हाळे पागडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Home महाराष्ट्र रत्नागिरी पाटपन्हाळे येथील पागडेवाडी येथे श्री साई मंदिराचा २३ वा वर्धापन दिनानिमित्त विविध...