पाल येथील दीपक केसरकरांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजन संपन्न 

वेंगुर्ला: प्रतिनिधी

तालुक्यातील पाल गावात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी श्री. मांजरेकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत आगामी काळात अशाच प्रकारे गावात विकास कामे आणायची असल्यास कोणत्याही आर्थिक आमिषाना बळी न पडता आपले हक्काचे व्यक्तिमत्व दीपक केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

आज मंगळवारी (८ ऑक्टोबर) तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पाल गोडावणेवाडी झेंडोबा मंदिर रास्ता काँक्रीटीकरण करणे (५ लाख) या रस्त्याचे पंचायत समिती माजी सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर पाल न्हैचीआड रस्ता ते अंबाई कॅशु फॅक्टरीकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे (८ लाख) या रस्त्याचे पाल सरपंच कावेरी गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप मुळीक, शाखाप्रमुख भरत गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक गावडे, उपविभाग प्रमुख संजय गावडे, युवा मोर्चाचे ओंकार गावडे, महादेव गावडे, प्रभाकर गावडे, श्रीनाथ तेली, सोनू गावडे, बापू गावडे, दत्ताराम गावडे, राजाराम गावडे, सुधीर गावड, उल्लास गावडे, सुभाष गावडे, लाडू गावडे, सुचिता नाईक, चंद्रकांत गावडे, दत्ताराम गावडे, महेश आंगचेकर आदी उपस्थित होते.

यावेळी येथील ग्रामस्थांच्या मागणी नुसार पुढील काळात झेंडोबा मंदिर हे नदीकिनारी असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने एक उत्तम धार्मिक स्थळ असून हा मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितीन मांजरेकर यांनी सांगितले. यावेळी विकास निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तर निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल नितीन मांजरेकर, सुनील मोरजकर, सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रीती गावडे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ग्रा प सदस्य मुळीक व अन्य प्रमुख गावकर मंडळी यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.