आमदार नितेश राणे यांचा पलटवार वार
त्यामुळेच कश्मीर फाईल,केरला स्टोरी दाखवण्यास विरोध
दिशा सालियन फाईल्स चित्रपटही ओटीटीवर येणार,आमदार राणे यांची माहिती
ठाकरेंना गुजराती बंधूंचा पैसा कसा चालतो केला सवाल
राउत यांनी ठाकरे सेनेतील नाईट लाईफ उघड करण्याची वेळ आणू नये
संतोष राऊळ | कणकवली : संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा अजेंडा चालवायचा आहे. माय नेम इज खान या चित्रपटाला विरोध करणारी शिवसेना आज कश्मीर फाईल,केरला स्टोरी दाखवण्यास विरोध करत आहे. कारण या लोकांचे राजकीय लव जिहाद झालेला आहे.यांना इथे शरीया कायदा लागू करायचा आहे. उद्धव ठाकरे आणि या सर्वांचे राजकीय धर्मांतरन झाले आहे. २०१९ ला यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकल्या आहेत. धर्मांतर करून टाकलं आहे. असा घनाघाती आरोप भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केला.
मी सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना भेटून केरला स्टोरी या चित्रपटाला करमुक्त करावं अशी विनंती करणार आहे. केरला स्टोरी सारखाच काही दिवसात दिशा सालियन फाईल्स हा चित्रपटही ओटीटीवर येणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते,आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांनी वेळोवेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे दिशा सालियनवर खरोखरच सिनेमा येणार आहे का? येणार असेल तर त्यात कुणावर आरोप केलेत ? या सिनेमामुळे कोण गोत्यात येणार ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
आमदार नितेश राणे यांनी आज प्रहार भवन येथे पत्रक परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. मुंबई तोडण्याचा डाव गुजरातमधून शिजतोय असं विधान राऊत यांनी केलं होतं. त्यावर नितेश राणे म्हणाले, तुम्हाला आता शाह आडनावाची अॅलर्जी वाटतेय. तर गुजराती बंधूंचा पैसा कसा चालतो तुम्हाला ?
तुमचा मालक बाहेरगावी जातो, तिकडचा खर्च कोणाचा असतो ? एक पैसाही उद्धव ठाकरेंच्या खिशातला जात नाही. यांचा सगळा खर्च हे उद्योगपती करत असतात. ते कसं चालतं ? तेव्हा हे गुजराती महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार आहेत असं वाटत नाही का ? असा सवाल करतानाच राजकारणासाठी द्वेष पसरवणं बंद करा, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.
लोकशाही आणि संविधान देशात नसते तर आमची सकाळ खराब केली असती का ?
संविधान धोक्यात आहे असे संजय राऊत म्हणाले. संविधान धोक्यात असतं तर तुमच्या सारख्या कार्ट्याने रोज सकाळी ९ वाजता येऊन आमची सकाळ खराब केली असती का ? तुमची अडीच वर्ष सत्ता होती तेव्हा संविधामाचे नियम पाळले असते तर आमच्या हिंदूंवर अत्याचार झाला नसता. रझा अकॅडमीचे लाड हे लोक करत बसले नसते. तुम्ही संविधानला मानत नाही.पंतप्रधानांनी टीका करणाऱ्यांची जी यादी सांगितली ते सामान्य लोक नव्हते तर ते काँग्रेसचे लोक होते, असं राणे म्हणाले.
*गोमूत्राने हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण करा
काल रात्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हुतात्मा स्मारकावर गेले होते. त्यामुळे गोमूत्राने हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण केले पाहिजे, असं ते म्हणाले. काल मी तेजस आणि आदित्यबद्दल बोललो. त्याचे उत्तर दया संजय राऊत, असं आव्हानच त्यांनी दिलं.
संजय राऊत यांना मी नाईटलाइफ बद्दलची माहिती अधिक द्यावी अशी इच्छा आहे आणि म्हणूनच ते अशा पद्धतीची भाजपवर टीका करत आहेत. ठाकरे सेनेतील नाईट लाईफ कुठे चालत होती. अक्षय कुमार जेथे राहतो त्या समोरील बाजूच्या बिल्डिंगमध्ये नाईट लाईटच्या पार्ट्या कोणाच्या होत होत्या. तेथे मंत्री कोण येत होता. कोणते अधिकारी आणि युवा सेनेचा प्रमुख कोणाला घेऊन येत होता. या सर्वांची माहिती माझ्याकडे आहे वेळप्रसंगी ते जाहीर करू असा इशाराही आमदार राणे यांनी दिला.










