मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिराचा १७ वा वर्धापनदिन ०४ मे २०२३ रोजी साजरा करण्यात येत आहे. सकाळी ०८.०० वा.
श्री महागणपती पूजा व अथर्वशीर्ष पठण,
सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वा. श्री. सत्यनारायण महापूजा,
दुपारी १२.३० वा.महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, रात्रौ. ७.३० नंतर श्री महागणपती प्रासादीक भजन मंडळ
यांचे सुश्राव्य भजन बुवा- अमित बागवे, रात्रौ ९.३० वा. नंतर ओंकार दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग
‘रक्तचंडाल’ होणार आहे.
उत्सवाचा व महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.