मळगाव रेडकरवाडी येथे ६ मे रोजी ‘देवी वैष्णो माता‘ नाट्यप्रयोग

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगांव रेडकरवाडी येथील श्री देव इशवटी प्रासादिक मंडळाच्या वतीने शनिवार ६ मे रोजी ‘श्री सत्यनारायण महापूजा ‘ आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त भजनादी कार्यक्रम व त्यानंतर रात्री ठीक ९ वाजता सुधाकर दळवी प्रस्तुत चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा ‘देवी वैष्णो माता‘ हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. श्री सत्यनारायण महापूजेला तसेच दशावतार नाट्यप्रयोगासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देव इशवटी मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

‘देवी वैष्णो माता ‘ हा चेंदवणकर गोरे नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सुप्रसिद्ध असून यात देवी वैष्णव माता हीचे चरित्र कथन करण्यात आले आहे. सुधाकर दळवी संचालित चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी, कुडाळतर्फे होणाऱ्या या देवी वैष्णो माता नाट्य प्रयोगाचे कथालेखन – विघ्नराजेंद्र कोंडुरकर यांनी केले असून यात गणपती – प्रशांत चव्हाण, रिद्धी सिद्धी – दिनेश मांजरेकर,अघोरी भैरव – सिद्धेश घोगळे,दुर्मुख – गौरेश पांचाळ,मारुती – प्रताप गावंडे,राजा – विघ्नराजेंद्र कोंदूरकर,राणी – संतोष गावडे, वैष्णू – सिद्धेश मुणनकर,नारद – सिकंदर गावकर, गंगलो – सुधीर देवळी,महाकाली – प्रशांत चव्हाण, सिंह – दिनेश मांजरेकर आदी कलाकारांचा सहभाग आहे. तर हार्मोनिअम – बाळा गावडे,पखवाज – संजय नाईक व  झांज – सचिन कुबल हे संगित साथ देणार आहेत. तरी या पौराणिक व दणदणीत नाट्यप्रयोगाचा लाभ दशावतार नाट्यप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sindhudurg