जय हिंद कॉलेजतर्फे “कुकरी वर्कशॉप” चे आयोजन

“Cookery Workshop” organized by Jai Hind College

अनेक पदार्थ बनविण्यास शिकण्याची संधी बारावीच्या विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश

सावंतवाडी । प्रतिनिधी : साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी खास मे महिन्यात “कुकरी वर्कशॉप” चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉप मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉर्न चीज पिझ्झा, पनीर पिझ्झा, चिकन पिझ्झा, व्हेज बर्गर यासह मॉकटेल, बेरी ब्लास्ट अशा विविध प्रकारचे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्हाट्सएप ग्रुप ला जॉईन व्हा बारावीच्या विद्यार्थ्यांना शुल्क तर अन्य विद्यार्थ्यांना ३९९ रुपये मध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत- जास्त विद्यार्थ्यांनी या वर्कशॉप चा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र नोट्स देण्यात येणार आहे. हे वर्कशॉप सावंतवाडी वेंगुर्ले व कुडाळ या तीन ठिकाणी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ७०३०९३८०९५, ७०३०९३८०९६ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.