Bhoomipujan by Nilesh Rane of Dhamapur Gawdewadi Thaviwadi road
मालवण | प्रतिनिधी : धामापूर येथील रस्ते डांबरीकरणं, खडीकरणच्या कामाचा शुभारंभ भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला झाला.
धामापूर गावासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विकास निधी उपलब्ध झाला होता. त्यातील गावडेवाडी थवीवाडी रस्ता व परबवाडी येथील इतर विकासकामांचे भूमिपूजन निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी सरपंच मानसी महेश परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर यासह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.













