The hunger strike by the farmers of Shirgaon against the forced land acquisition was called off by the mediation of the District Industry Centre
मंडणगड | प्रतिनिधी : सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्यगीक वसाहतीकरिता मौजे शिरगाव येथील शेतकऱ्यांच्या सक्तीने भुसंपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात या मागणीसाठी शिरगाव येथील शेतकरी 1 मे 2023 रोजी माजी सभापती राजकुमार निगुडकर व चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड तहसिल कार्यालयसमोर उपोषणास बसले होते. रत्नागिरीचे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थपक श्री. एच. एम आंधळे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन या विषया संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या विषया संदर्भात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना 17 एप्रिल 2023 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानुसार (1) मे 2023 रोजी शिरगाव येथील महिला व पुरुष ग्रामस्थांनी मे महिन्याच्या उन्हाच्या लाहीतही उपोषणास बसले होते. स्थानीक प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा केली मात्र आंदोलक आपल्या भुमीकेवर ठाम होते. दरम्याने जिल्हा उद्योग केंद्रे रत्नागिरी चे व्यवस्थापक श्री. आंधळे यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमेवत मंडणगड येथे आंदोलकांची भेट घेवून त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली.
या चर्चे दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचेवतीने तसे पत्र राजकूमार निगुडकर यांना देण्यात आले आहे. दरम्यान राजकुमार निगुडकर, चंद्रकांत दळवी यांच्यासह जयवंती शिगवण, अनिल दळवी, विनोद निगुडकर, वंसत निगुडकर, दत्तात्रय दळवी, पांडुरंग दळवी, नंदकुमार दळवी, काशीराम शिगवण, कस्तुरी दळवी, मनाली दळवी, मनोहर दळवी, सुनील दळवी, उज्वला दळवी, रचना निगुडकर, कल्पना निगुडकर, संतोष सुगदरे, मधुकर पाटील, गणेश दळवी, शैलेंद्र दळवी, मनोज निगुडकर, जयंता दळवी, सिताराम शिगवण, संतोष दळवी, प्रदीप दळवी, संदीप सुर्वे, अनंत शिगवण, शरद दऴवी, प्रकाश दळवी, सुलभा दळवी आदी ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संतोष घोसाळकर, किशोर दळवी उपस्थित होतेएकतर्फी भु संपादनाची तालुकावासीयांना उपोषणाचे निमीत्ताने माहीती देण्यात आली. तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांना आपला पाठींबा दर्शविला.