90th Anniversary Celebration of Mandal on 6th May at Bamanoli Dingankarwadi
समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात ॲड. रोशन पाटील करणार मार्गदर्शन
चिपळूण | वार्ताहर : तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी बामणोली यांच्यावतीने शनिवार ६ मे रोजी मंडळाचा ९० वा वर्धापनदिन सोहळा आणि सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
डिंगणकरवाडी सभागृह येथे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत दिनांक ५ मे रोजी २ ते ४ महिला हळदीकुंकू समारंभ त्यानंतर ५.३० ते ७.३० वाजता समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे नामवंत युवा प्रबोधनकार अॅड. रोशन पाटील हे आपली संस्कृती व महापुरुषांची सामाजिक क्रांती या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. हे आपली संस्कृती आणि महापुरुषाची सामाजिक क्रांती या विषयावरती प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार आहेत.
रोशन पाटील हे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व असून आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीतून लोकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण हक्क परिषद कार्यक्रम राबवत कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत, यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम सुद्धा घेतलेले आहेत. या कार्यक्रमाला तालुक्यातून परिवर्तन विचारांचे आणि इतर सर्वच लोक उपस्थित राहणार आहेत. आपली संस्कृती व महापुरुषांची सामाजिक क्रांती या विषयासंदर्भात मार्गदर्शनपर प्रबोधन होणार आहे.
शनिवार ६ रोजी दुपारी २ ते ४ वाजता सत्यनारायण महापूजा ४.३० ते ५.३० वाजता सुमधुर भजने, ७ ते ९ महाप्रसाद, १० ते ११ वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मान्यवर सत्कार आणि रात्री ११.३० वाजता श्री वरदान देवी नमन नाट्य मंडळ तुरळ संगमेश्वर यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.