Fara Pratishthan award distribution today
दोडामार्ग | प्रतिनिधी : आदर्श शिक्षक फक्रोजीराव देसाई यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या फ.रा. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मंगळवार २ मे रोजी होणार आहे. यावेळी पुणे येथील शिवशंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प. धर्मराज हांडे महाराज उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त सकाळी प्रतिमापूजन, सत्यनारायण महापूजा, आरती, महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ होईल. संध्याकाळी ७ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यानंतर ह.भ.प. धर्मराज हांडे महाराज यांचे शिवचरित्रावर प्रबोधनात्मक व्याख्यान होईल. त्यांनतर श्री दत्त माऊली दशावतार मंडळाचा ‘कुक्कुटेश्वर महिमा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन फ.रा.प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई व संयोजक युवाशक्ती, महापुरुष, अवाटवाडी व स्टार युवक मंडळ आदर्श गाव केर यांनी केले आहे











