Crime against dead two wheeler driver in two wheeler accident in Kranti Nagar
रत्नागिरी | प्रतिनिधी : बेदरकारपणे दुचाकी चालवत ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात करुन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना 29 एप्रिल रोजी रात्री 8 वा.सुमरास क्रांतीनगर बसस्टॉपजवळ घडली होती.
संकेत कृष्णा पाटील (32,रा.मिरजोळे पाटीलवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मृत दुचाकी चालकाचे नाव आहे.29 एप्रिल रोजी ईश्वर वाघमारे (31,रा.वठार हातकणंगले,कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील ट्रक घेउन एमआयडीसी-मिरजोळे,कोकणनगर मार्गे चिपळूणला जात होते.ते क्रांतीनगर बसस्टॉपजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून येणार संकेत आपल्या ताब्यातील एव्हीएटर दुचाकी घेउन भरधाव वेगाने त्यांना ओव्हरटे करण्याचा प्रयत्न करत होता.परंतू त्याचवेळी समोरुन रिक्षा व इतर वाहने आल्याने संकेतने दुचाकी डाव्या बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुचाकीवरील नियंत्रण सूटून ट्रकच्या उजव्या बाजुच्या मागील टायरजवळ आदळली.यात संकेतच्या डोक्याला व इतर शरीराला गंभिर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.