निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना मोठा दिलासा ….!

Google search engine
Google search engine

१२ महिन्यांमध्ये वैधता प्रमाणपत्र देण्याचे हमीपत्र सादर करावे लागणार

कणकवली : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, या निवडणुकांमध्ये ओबीसी, किंवा अनुसूचित जाती, जमाती, या राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नाही. तर जे उमेदवार अशा राखीव जागेवर निवडणूक लढविण्याकरता नामनिर्देशन पत्र सादर करतील अशा उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत, नामनिर्देशन पत्रासोबत जोडता येणार आहे. तसेच पडताळणी समितीकडे अर्ज केलेले असा कोणताही पुरावा जोडावा लागणार आहे. तसेच निवडून आल्या च्या दिनांक पासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करीन असे हमीपत्र उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत देण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे.. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत होते. ज्यांच्याजवळ जात वैधता प्रमाणपत्र आहे त्यांना पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र जोडता येणार आहे. राखीव जागेवर नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबतच जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याची अट कायद्यात होती.

A big relief to the candidates from the Election Commission….!

परंतु त्यानंतर वारंवार अनेक निवडणुकांमध्ये अखेरच्या टप्प्यात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पावती जोडण्याबाबत आदेश दिले जात होते. त्यामुळे अखेर पर्यंत राखीव जागांवरील उमेदवारांचा जीवटांगणीला लागत होता. मात्र यावेळी निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर करतानाच या मुद्दयाबाबत स्पष्टपणे आदेश दिल्याने इच्छुक उमेदवारांचा मात्र जीव भांड्यात पडला आहे.