Secondary Teachers, Non-Teachers Credit Fund Election should not be conducted during voting holidays….
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ यांचे साकडे ; जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली माहिती
मालवण : एप्रिल 2021 मध्ये प्रस्तावित असलेली, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था ओरोस ची पंचवार्षिक निवडणूक कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्ष पुढे ढकलण्यात आली…
सात वर्षानंतर पतपेढी निवडणूक कार्यक्रम होऊ घातलेला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पगारदार पतसंस्थेमध्ये सर्व सभासद हे शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षकेतर कर्मचारी असे असून दिनांक 2 मे 2023 ते 15 जून 2023 या कालावधीमध्ये या सर्वांना दरवर्षीप्रमाणे उन्हाळी सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत.
बहुतांशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे नोकरीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून वास्तव्यास असतात, सुट्ट्यांच्या अगोदर तीन महिने ते आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे,बस यांचं आरक्षण करून ठेवतात.
पतपेढी निवडणूक कार्यक्रम यादी 21 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेली असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांच्याकडून पतपेढी प्रत्यक्ष मतदान हे सुट्टीच्या कालावधीत येऊ शकते असे झाल्यास बहुतांशी शिक्षक आपल्या मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहू शकतात. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ आपल्या सर्व सभासदांच्या वतीने सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पत्राद्वारे प्रत्यक्ष निवडणूक मतदान हे सुट्ट्या संपल्यानंतर 15 जून नंतर घ्यावं यासाठी साकड घातलेल आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांनाही संपूर्ण जिल्ह्यातून सर्व सभासदांच्या सह्यांचे निवेदन दिले जाणार आहे. मतदानाच्या मूलभूत हक्कापासून सभासदांना वंचित ठेवू नये अशी विनंती सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे सचिव विजय मयेकर यांनी केली आहे.
यापुर्वी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया एप्रिल महिन्यात घेतली जात होती या एप्रिल महिन्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शालेय कामकाजातून उसंत मिळत होती. आजपर्यंतच्या पतपेढी निवडणूक कार्यक्रम इतिहासात प्रत्येक वेळी एप्रिल महिन्यात शाळा चालू असताना मतदान प्रक्रिया घेतली गेलेली आहे कोरोना काळामध्ये कार्यरत संचालक मंडळाला कालावधी वाढवून दिल्याने एप्रिल महिन्यातील मतदानाची प्रक्रिया पुढे जाऊन, ती सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर मतदान प्रक्रिया घ्यावी अशी सर्व सभासदांमधून विनंती करण्यात येत आहे.