उद्धव ठाकरे एक दिवसासाठी नको एक महिना येऊन कोकणात राहा आणि त्यांचे प्रश्न जाणून घ्या : प्रमोद जठार 

Don’t politicize the development here by showing love to Uddhav Thackeray Putna Mavashi: Pramod Jathar

 

पुतना मावशीचं प्रेम दाखवत इथल्या विकासाचं राजकारण करू नका 

रत्नागिरी | प्रतिनिधी :ज्यांनी बारसू येथे रिफायनरी होण्यासाठी केंद्राला पत्र दिलं ते सत्ता गेल्यानंतर विरोधाचं राजकारण करतायेत

 

उद्धव ठाकरे कोकणात नक्की या, एक दिवस नको एक महिना या, सहकुटुंब या, पण इथले प्रश्न समजून घ्या, इथली बेरोजगारी समजून घ्या, प्रकल्पला विरोध करून पुतना मावशीचं प्रेम दाखवू नका

 

ज्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणी माणसाबद्दल प्रेम दाटून आलंय तेच ठाकरे कोरोना काळात कोकणी माणसाला सीमेवरच अडवत होते, परत मुंबईला पाठवत होते, त्यांचे हाल करत होते

 

ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही पुत्र आहात ते बाळासाहेब कधीच शब्द फिरवत नव्हते, तुम्ही तर चक्क रिफायनरीसाठी दिलेले पत्राच्या नाकारताय, जनाची नाही किमान मनाची लाज बाळगा

 

शरद पवारांचं कौतुक करावं लागेल, ते विरोधात आहेत पण देशाच्या विकासाच्या विरोधात नाहीत, त्यांनी प्रश्न समजून घेतला आणि लोकांचे म्हणणे ऐकून घ्या असं सांगितलं, उद्धव ठाकरे यांच्यासारखं लोकांना भडकवलं किंवा चिथावणी दिली नाही

 

उद्धव ठाकरेंकडून कोकणवासियांची बिलकुल अपेक्षा नाही, जे आपल्या भावाचे झाले नाहीत, कुटुंबाचे झाले नाहीत ते आमचे प्रश्न कसे सोडवणार

 

बाहेरून एन जि ओ ची माणसे येतात त्यांना पैसे कोण देत? वालम विरोध करायला 4 कोटी कसे खर्च करू शकतो?

 

खरंतर खासदार विनायक राऊत यांनी इथल्या माणसांचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीत जाऊन बसायला हवे होते पण राऊत यांनी गेल्या 9-10 वर्षात साधा महामार्ग सुद्धा पूर्ण करून घेतला नाही, उलट आपल्या मुलाला टोलच कंत्राट मिळावं यासाठी प्रयत्न केले, भूमिपूजन केले पण इथल्या मुलांना 1 रुपयांचा रोजगार मात्र दिला नाही

 

 का तुमचे राजन साळवी तुमच्यासोबत नाहीत कारण ते भूमिपुत्र आहेत, त्यांना इथले प्रश्न माहितीयेत, उदय सामंत आज तुमच्यासोबत नाहीत, वैभव नाईक सुद्धा प्रकल्प हवा असे का म्हणतायेत, तुमच्याच अनंत गीते यांना हार्दिक प्रकल्प गुहागरला हवा होता…. लोकांना फसवू नका इथल्या विकासाशी खेळू नका, कोकणची जनता स्वाभिमानी आहे, कोकणाने तुम्हाला भरभरून दिले आहे त्यांच्याशी प्रामाणिक राहा

 

केंद्र सरकारने जमिनीचे दर जाहीर करावे अशीही मागणी केली