शिरोडा वेळागर येथे ताज प्रकल्प भुमिपुजन विरोध प्रकरण..

सुमारे १०० जणाविरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वेंगुर्ले : दाजी नाईक
शिरोडा वेळागर येथे ताज प्रकल्पाचा भुमिपुजन कार्यक्रम रविवारी सायंकाळी प्रशासनामार्फत होत असताना तेथे बेकायदेशीर जमाव केला. तसेच मंत्री महोदय भुमीपुजन करून परत जात असताना त्यांच्या वाहनाचा ताफा अडविला व मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला म्हणुन सुमारे ८० ते १०० जणाविरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.