लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणारा टेम्पो पलटला | अनेक जण गंभीर जखमी

Returning with the wedding bridegroom, the tempo turned Many people were seriously injured

जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

कणकवली : वागदे तेथील हॉटेल वक्रतुंड समोर बोलेरो पिकपने लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा बोलेरो पिकप टेम्पो पलटी होत भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात जवळपास २५ पेक्षा अधिकजण जखमी झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

देवगड पाडगावच्या दिशेने जाणारे हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असताना पिकप चालकाने डिव्हायडरवर पिकप गाडी चढवल्याने महामार्गावर पिकप टेम्पो पलटी झाला. यात अनेकांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळताच महामार्गावरून जाणाऱ्या राजा पाटकर यांच्यासह वागदे सरपंच संदीप सावंत, यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी जि.प. उपाध्यक्ष रंजन राणे, हृतिक नलावडे, यांच्यासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अनेक अनेकांना गंभीर इजा झाली असून रक्तबंबाळ अवस्थेत प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.