Five students of Jagushte High School shone in the NMMS scholarship examination
रत्नागिरी : शहराजवळील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत यश मिळवून चमकदार कामगिरी केली आहे.
पाच विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी येळणे, मयुरी गडदे, प्रियांका वाघ या तीन विद्यार्थीनींचा व रोशन वायाळ, श्रेयस साळुंखे या विद्यार्थ्याचा समावेश आहे. शाळेतून २१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यातील १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आणि 5 विद्यार्थ्यांनी गुणवत्तात यादी स्थान पटकावले आहे.
विद्यार्थ्याना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. राजीव सप्रे, कीर्ती जाधव, सौ. सिद्धी जोशी, सौ. श्रावणी जोशी, मारुती खरटमोल, नीलम कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. पूजा कात्रे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.