गणेशमूर्तींचे वेगळेपण व्यावसायिक स्वरूपाच्या माध्यमातून पुढे नेण्याची गरज : मनिष दळवी

जिल्हा बँक गणेश मूर्तिकारांच्या सदैव पाठीशी

जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन

कुडाळ । प्रतिनिधी :

सिधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीचे वेगळेपण राज्यातच नव्हे तर देशातही अधोरेखित झाले आहे. मात्र, हे वेगळेपण व्यावसायिक स्वरूपाच्या माध्यमातून पुढे नेण्याची गरज आहे. ही कला टिकवण्यासाठी कुठल्यातरी यंत्रणेचे पाठबळ हवे आहे. यासाठीच जिल्हा बँकेने पुढाकार घेतला असून जिल्हा बँक या गणेश मूर्ती करांच्या सदैव भक्कमपणे पाठीशी राहील, अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा

११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ओंकार डिलक्स,हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,श्री गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, सौ.नीता राणे,गणपत देसाई, समीर सावंत, मुख्य कार्यकारी प्रमोद गावडे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, ॲड. राजीव कुडाळकर, उदय तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीकारांसह सातारा, रायगड मधून गणेश मूर्तिकार उपस्थित होते.

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० हजार हून अधिक गणेश मूर्ती केल्या जातात यातून सुमारे २०० कोटीची उलाढाल होते जास्त उलाढाल झाली पाहिजे या गणेशमूर्ती घडविण्याला व्यवसायाचे स्वरूप मिळाले पाहिजे यासाठी जिल्हा बँकेने वाटचाल केली आहे असे सांगितले.

यावेळी माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले, कलेला राजाश्रयाची गरज आहे गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धा या वेगळ्या विषयाला अनुसरून जिल्हा बँकेने या कलेला व्यवसायाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन जी वाटचाल केली ती अतिशय कौतूकास्पद आहे अशा प्रकारच्या कलेच्या माध्यमातून हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे जतन केले जात आहे आपल्या या कलेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना विविध कलांतून या जिल्ह्यात पर्यटक मोठया प्रमाणात यावेत असा संकल्प करूया असे सांगितले लखमराजे यानी आपण पर्यावरण जपले पाहिजे भविष्यात पर्यावरणाची जोपासना न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल आपण गणेश मूर्ती बनवतो त्यासाठी वापरणारा रंग हा ऑइलपेंट असतो तो रंग बदलून ऑरगॅनिक रंग या गणेशमूर्तीसाठी वापरण्याची काळाची गरज असल्याने स्पष्ट केले अतुल काळसेकर यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा हा कौतुक करण्याचा उपक्रम आहे पेणमध्ये पीओपीचे हब आहे तसा पर्यावरण पूरक गणेशमूर्तीचा हब सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला पाहीजे जिल्ह्यात गणेशशाळा ऐवजी गणपतीचा कारखाना झाल्यास व्यवसायिक स्वरूप प्राप्त होईल असे सांगितले जिल्ह्यातील 120 गणेशमूर्तिकार इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शनात सहभागी झाले हे प्रगतीचे द्योतक असल्याचे सांगितले आभार नवीन मालवणकर यांनी मानले

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १३नोव्हेंबरला सायंकाळी ३.३० वा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.या प्रदर्शन व स्पर्धे मध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील १२०मूर्तीकारांनी सहभाग नोदवला असुन जिल्ह्यातील गणेश भक्तांना १२० अप्रतिम कलाकृती पहाण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. उद्या शनिवारी १२ व १३नोव्हेंबरलाअक्षय मेस्त्री,घोडगे सिध्देश तेली,परूळे यांना मूर्तिकार प्रात्यक्षिकांसाठी निमंत्रित करण्यात आले असुन गणेश भक्तांना या दोन दिवशी गणेश मूर्ती घडत असतानाचे प्रात्यक्षिक पहाता येणार आहे.

Sindhudurg