Liquor worth eleven and a half lakhs was caught in Banda
बांदा पोलीसांची धडक कारवाई
बांदा : प्रविण परब
गोव्यातून गुजरातकडे होणार्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी मंगळवारी रात्री उशिरा कारवाई केली. या कारवाईत ११ लाख ६५ हजार ३९५ रुपयांच्या दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे २० लाखांचा ट्रक असा एकूण ३१ लाख ६५ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रदीपकुमार श्रीभगवती प्रसाद व महम्मद शबीर वहिदीभाई इंद्राशी, दोघेही रा. गुजरात यांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकमध्ये चोरकप्पा तयार करुन सदर दारु वाहतूक करण्यार येत होती.
सदर कारवाई मंगळवारी इन्सुली चेकपोस्टवर करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे व उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार व कॉन्स्टेबल प्रसाद पाटील यांनी कारवाई केली.
Sindhudurg