कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरीचा दापोली येथे सेमिनार संपन्न

Tax Consultants Association Ratnagiri conducted a seminar at Dapoli

दापोली : “हॉटेल अभिषेक” येथे कर सल्लागार असोसिएशने सेमिनारचे आयोजन केले होते. सेमिनारमध्ये ॲड. अभिजीत बेर्डे यांनी ‘जीएसटी कायद्यामधील नवीन बदल’, यासंदर्भातील ज्ञानसत्र घेवून सभासदांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अक्षय फाटक यांनी व्हॉट्सअँप , फेसबुक, इंस्टाग्राम, टयूटर इ. सोशल मिडिया वापरताना कोणती काळजी घ्यायची, ऑनलाईन बँकिंग वापरताना कोणत्या प्रकारे सुरक्षित रितीने बँकिंग करावे, फ्रॉड कॉल कशा प्रकारे टाळावेत या संदर्भात सभासदांना मार्गदर्शन केले.

या सेमिनार करीता अध्यक्ष सीए. वरदराज पंडीत, उपाध्यक्ष श्री राजेश गांगण, सचिव सीए. वैभव देवधर, सीए. मंदार गाडगीळ, माजी सचिव रमाकांतजी पाथरे, ॲड. रविंद्र साळवी, सदस्य सीए. कौस्तुभ दाबके, श्री. समीर तलाठी, श्री. रत्नाकर शिलेवंत, सीए. श्रेयस काकीर्डे, मनोज भिडे इ. अथक मेहनत घेतली. या सेमिनारमध्ये दापोली व खेड़ मधील सीए, कर सल्लागार, ॲडव्होकेट यांना असोसिएशनचे नवीन सदस्यत्व देण्यात आले.