खेड रेल्वे स्थानकात आढळला अज्ञाताचा मृतदेह

खेड(प्रतिनिधी)
येथील रेल्वे स्थानकातील वेटिंग रुममध्ये एका ४५ वर्षीय प्रौढा चा गुरुवारी सकाळी ८ वा च्या सुमारास मृतदेह आढळून आला.
एक अनोळखी पुरुष इसम सुमारे ४० ते ४५ वर्षे रेल्वे स्टेशन खेड येथील सर्वसाधारण वेटिंग रुममध्ये लादीवर उपडे स्थितीत व नाकातून रक्त आलेल्या स्थितीत मिळून आलेला असून त्यास अॅम्बुलन्सने उपचारा करीता उपजिल्हा रुग्णालय कळंबणी,  येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो मयत असल्याचे घोषित केले पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.